Jaimaharashtra news

शिवसेनेचे मुख्यमंत्रीपद कुणामुळे ?; वाचा जनता काय म्हणते…

मुंबई (दि. ०६/०९/२०२१):

 

 

“शिवसेनेचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीमुळे”, असे विधान राज्याचे जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केले होते. त्यावर जनतेने जयंत पाटील ह्यांच्या बाजूने कौल देत मुख्यमंत्रीपद परावलंबी असल्याचे म्हटले आहे. जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या ट्विटर सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.

 

 

महाविकास आघाडीतील धुसफूस महाराष्ट्रासाठी नवी नाही. त्यातच “शिवसेनेचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीमुळे”, असे विधान जयंत पाटील यांनी केले होते. जयंत पाटील यांच्या विधानाच्या अनुषंगाने जनतेचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न जय महाराष्ट्र वृत्तवाहिनेने केला होता.

 

 

ट्विटरच्या माध्यमातून नागरिकांना पर्याय देण्यात आले.

 

 

१. परावलंबी मुख्यमंत्रीपद ? २. ‘एनसीपी’मुळे सेना सत्तेत ? ३. सेनेमुळे काँग्रेस सत्तेत ? असे तीन पर्याय देण्यात आले होते. जय महाराष्ट्र वृत्तसंस्थेने दिलेल्या तीन पर्यायांपैकी ४७ टक्के लोकांनी ‘परावलंबी मुख्यमंत्रीपद’ या पर्यायाला पसंती दिली आहे. तर ‘एनसीपीमुळे सेना सत्तेत’ या पर्यायाला ३८ टक्के लोकांनी पसंती दर्शविली आहे. १६ टक्के लोकांचे म्हणणे ‘सेनेमुळे काँग्रेस सत्तेत’ असे आहे.

 

 

तरीही मोठ्या प्रमाणावर जनतेने मुखमंत्रीपद परावलंबी असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे जयंत पाटील यांच्या वक्तव्यात तथ्य असल्याचे सर्वेक्षणातून दिसते.

Exit mobile version