Jaimaharashtra news

आझम खान आणि मनेका गांधींवर आयोगाची प्रचारबंदी

केंद्रीय मंत्री मनेका गांधी आणि समादवादी पार्टीचे नेते आझम खान यांच्यावर निवडणूक आयोगाने काही तासासांठी प्रचारबंदी घातली आहे. आचारसंहिता भंग केल्याने निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे. आझम खान यांच्यावर 72 तासांची तर मनेका गांधी यांच्यावर 48 तासांची भाषणबंदी करण्यात आली आहे. आझम खान यांनी जया प्रदांवर अश्लील वक्तव्य केल होतं तर मनेका गांधी यांनी मतासाठी भर सभेत धमकी दिली होती. आज सकाळी 10 वाजल्यापासून ही प्रचारबंदी केली आहे.

मनेका गांधीची अल्पसंख्याकांना धमकी

मतदान करण्यासाठी अल्पसंख्याकांना धमकावल्या प्रकरणी मनेका गांधी अडचणीत आल्या आहेत.

मेनका गांधी सुल्तानपूर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार आहेत.

मी निवडणूक जिंकणार असून तुम्ही मला साथ द्या.

जर साथ दिली नाही तर जिंकल्यानंतर मी तुमच्याबरोबर काय करेन, बघा, अशी धमकी त्यांनी दिली होती.

याप्रकरणी कारवाई करत आयोगाकडून 48 तासांची भाषणबंदी करण्यात आली आहे.

आझम खान यांचे जया प्रदांवर आक्षेपार्ह वक्तव्य

आझम खान यांनी भाजपच्या रामपूरच्या भाजपच्या उमेदवार जया प्रदांवर अश्लील शब्दात टीका केली होती.

या विधानामुळे आझम खान यांच्यावर सर्व स्तरातून निंदा करण्यात येत होती

या वक्तव्यामुळे त्यांच्यावर एफआयआर दाखल झालं असून महिला आयोगाने त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागितलं होत.

याप्रकरणी कारवाई करत आयोगाकडून 72 तासांची भाषणबंदी करण्यात आली आहे.

Exit mobile version