Fri. May 20th, 2022

आरोग्यासाठी डाळिंब फळ हे फायदेशीर

मुंबई : डाळिंब हे फळ आरोग्यासाठी फार फायदेशीर आहे. डाळिंब फळाचे फायदे हे भरपूर आहेत.डाळिंब ज्युस पिल्याने तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. डाळिंब ज्युस पिल्याने पचन सुधारते. डाळिंब खाल्ल्यानं रक्त वाढत असून रक्त शुद्ध देखील होते.

पचनशक्ती वाढते :

डाळींबातील औषधी तत्व हृदय, पोट, यकृत यांचं कार्य व्यवस्थित चालण्यास मदत करतात.

डाळिंब खाल्ल्याने भूक लागण्याचे प्रमाण वाढते, वजन कमी करण्यासही डाळिंब ज्युस महत्वाचा ठरतो,

उन्हाळ्यात डाळिंब ज्यूस अधिक महत्वाचा ठरतो. तहान कमी करतो. पचनशक्ती वाढते. त्वचा निरोगी राखण्यासही डाळिंब महत्वाची भूमिका बजावतं.

शरीरातील श्युगर लेव्हल मेन्टेन ठेवते.

डाळिंब ज्यूस किंवा डाळिंब खाल्ल्याने शरीरातील श्युगर लेव्हल मेन्टेन राहते, इतर फळांप्रमाणे तिची पातळी वाढत नाही.

शरीरातील श्युगर संतुलित करण्याचं कामंही डाळिंब करतं.

शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते :

डाळिंबामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते, एवढंच नाही तर हिरड्या मजबूत करून दातांची दुर्घंधी घालवण्यासही मदत होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.