Jaimaharashtra news

पूजा चव्हाणच्या वडिलांनी केला गौप्यस्फोट

पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी रोज राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप होतं असतांना दिसत आहे. एकीकडे भाजपा संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारने जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाहीत तोवर कारवाई न करण्याची भूमिका घेतली आहे. शिवाय या प्रकरणी पुजाच्या वडिलांनी एक गौप्यसेफोट केला आहे. “पूजावर खूप ताण होता. तिच्या डोक्यावरील कर्ज वाढलं होतं. पोल्ट्री फार्मसाठी तिने कर्ज घेतलं होतं, यामध्ये तिचं खूप मोठं नुकसान झाल्यानं यामधून निघाण्यासाठी पुण्याला जाऊन दुसरं काही तरी काम सुरू करणार होती असं ती म्हणून निघाली होती. अशी माहिती तिच्या वडिलांनी दिली आहे. भाजपाने पूजा चव्हाणचा मुद्दा आक्रमकतेने मांडत असताना तिच्या वडिलांनी मात्र अनेक गंभीर आरोप केले असून पुजा ही तीन वर्ष भाजपा कार्यकर्ता होती. तिने भाजपासाठी काम केलं आहे. असं पूजाच्या वडिलांनी सांगितलं आहे. पूजावर खूप ताण होता असं तिच्या वडिलांनी खुलासा केला. यादरम्यान मंत्र्यांचं नाव जोडलं जात असल्याचं प्रश्नावर त्यांनी सांगितलं की, “मंत्री असो किंवा कोणीही असो तपासानंतर त्यांच्यावर कारवाई होईल मात्र सध्या तरी पुजाची बदनामी करणं थांबवा. “पूजाने तीन वर्ष भाजपासाठी काम केलं. तिथं कोणी काही विचारत नव्हतं. काय झालं नेमकं मला माहिती नाही”असं पुजाच्या वडिलांनी म्हटलं.

Exit mobile version