Thu. Aug 13th, 2020

खासदार पूनम महाजनांनी घेतली सुपरस्टार रजनीकांतची भेट; राजकीय वर्तुळात सुरु झाली भाजप प्रवेशाची चर्चा

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षा खासदार पूनम महाजन यांनी सुपरस्टार रजनीकांत यांची चेन्नईत भेट घेतली.

 

या भेटीवरुन पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा बघायला मिळतेय.  रजनीकांत यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा यानिमित्ताने नव्याने रंगू लागली आहे.

 

पूनम महाजन सध्या तामिळनाडूत असून भाजपच्या कार्यकर्त्यांना त्या मार्गदर्शन करत आहेत. रविवारी चेन्नईत पूनम महाजन यांनी रजनीकांत आणि त्यांची पत्नी लता

यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

 

यादरम्यान मुरलीधर राव आणि भाजपचे आणखी एक नेते उपस्थित होते. ही भेट राजकीय नसल्याचे पुनम महाजन यांनी सांगितले.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *