Sun. Oct 17th, 2021

Tollywood चे प्रसिद्ध कॉमेडियन वेणू माधव यांचं निधन

वेणू माधव याचे वयाच्या ३९ वर्षी दुखद निधन  झाले आहे.  त्यांच्या  निधनामुळे टॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.

तेलुगू सिनेमसृष्टीतील आघाडीचे विनोदवीर वेणू माधव यांचं अवघ्या 39व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांच्या या अकस्मात निधनाने Tollywood वर शोककळा पसरली आहे.

24 सप्टेंबर रोजी त्यांना सिकंदरबाजमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ते मूत्रपिंडाशी संबधित आजाराने ग्रस्त होते. त्यांना लवकरात लवकर किडनी प्रत्यारोपन करण्यास डॉक्टरांनी सांगितलं होतं.  परंतु 24 तासांच्या आतच त्यांची प्राणज्योत मालवली.

गेल्याच आठवड्यातच त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला होता. मात्र डिस्चार्ज मिळाल्यानंतर पुन्हा दोन दिवसात त्यांची तबेत आणखी जास्त बिघडली.

अखेर 24 सप्टेंबरला सिकंदरबाजमधील खासगी रुग्णलयात त्यांचं निधन झालं.

 

सध्या सगळीकडेच दक्षिण भारतीय भाषांतील हिंदी सिनेमांची dubbed versions पाहायची क्रेझ आहे.

त्यातही विशेषतः तेलुगू सिनेमे म्हणजेच Tollywood चे सिनेमे पाहाणारा प्रेक्षकवर्ग मोठा आहे.

या सिनेमांत असे अनेक कलाकार आहेत, जे लहानशा भूमिकेत जरी असले, तरी त्यांच्याशिवाय सिनेमा पूर्णच होत नाही.

वेणु माधवच्या बाबतीत असंच काहीसं होतं.

आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी लोकांना खळखळून हसवलं.  ब्रह्मानंदम, अली यांसारख्या सुप्रसिद्ध विनोदवीरांबरोबरच ठेंगण्या आणि गमतीदार वेणू माधव यांनी अनेक तेलुगू सिनेमे गाजवले. मात्र आता पुन्हा चित्रपटात ते दिसणार नाहीत, याबद्दल संपूर्ण तेलुगू सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जातेय.

वेणू माधव-

आंध्र प्रदेशमधील नलगोंडा येथे त्यांचा जन्म झाला होता.

मिमिक्री कलाकार म्हणून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

1996 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘संप्रदायम’ या तेलगू चित्रपटातून पर्दापण केलं.

वेणू माधव यांनी आत्तापावेतो 200 तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या.

दोन वर्षापासून  ते राजकारणातही उतरले होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *