Thu. Jan 20th, 2022

महेश मांजरेकरच्या चित्रपटाचा अश्लील ट्रेलर हटवला

निर्माते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या आगामी चित्रपट ‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’ हा चित्रपट वादात सापडला आहे. गिरणी कामगार चळवळीची वाताहत होण्याचा आधारावर हा चित्रपट असून या चित्रपटाचा ट्रेलर अश्लील असल्याचा दावा महिला आयोगाने केला आहे. त्यामुळे आता त्यांच्या या चित्रपटाचा ट्रेलर हटवण्यात आला आहे.

महेश मांजरेकरच्या या चित्रपटाचा अश्लील ट्रेलरमध्ये अल्पवयीन मुलांची आक्षेपार्ह दृश्य काढून टाकण्याची मागणी राष्ट्रीय महिला आयोगाने केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे केली आहे.

महेश मांजरेकर यांच्या या चित्रपटाचा ट्रेलर १० जानेवारी रोजी प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरमध्ये अश्लील दृश्य दाखवण्यात आली असून ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या पालकांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. तर ट्रेलरमधील आक्षेपार्ह विधान, दृश्य वगळण्याची मागणीसुद्धा त्यांनी केली आहे. या तक्रारीची दखल घेत, राज्य महिला आयोगाच्यावतीने या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटीसीमध्ये या चित्रपटासाठीची त्यांची संकल्पना, कथानक, भूमिका खुलासाकरून पत्र पाठवावे असे, नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *