Wed. Aug 10th, 2022

अंशतः टाळेबंदी लागू होण्याची शक्यता

मुंबई : राज्यातील भागांबरोबरच मुंबईतही कोरोनाचा उद्रेक होताना दिसत आहे. दररोज १ हजारापेक्षा जास्त करोना रुग्ण आढळून येत असून, आरोग्य विभागासमोरील आव्हान वाढले आहे. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे राज्यातील अनेक शहरांमध्ये अशंतः लॉकडाउन आणि नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. मात्र, आता मुंबईतही अंशतः लॉकडाउन लागू होण्याची शक्यता आहे. मुंबईसह राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली होती .

ज्या ज्या शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये करोना रुग्णांची संख्या वाढत आहे तेथील जिल्हाधिकारी यांना आदेश दिलेले आहेत ते परिस्थिती नुसार निर्णय घेतील. मुंबई मध्ये काही नाइट क्लब अजूनही सुरू आहेत. ट्रेन, बस, लग्न समारंभ, गर्दीची ठिकाणे, पर्यटन स्थळ या सर्व बाबींचा विचार करण्यात येत आहे. जर मुंबईमध्ये संख्या अजून वाढत गेली तर अंशता टाळेबंदी केली जाऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.