Sun. Aug 18th, 2019

अवनी वाघिणीचा पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट… संशयाचं धुकं कायम!

0Shares

यवतमाळच्या पांढरकवडा येथे 2 नोव्हेंबर रोजी टी-1 वाघिणीला ठार करण्यात आले होते, त्यावेळी तिच्या शरीराचे काही भाग गोरेवाडा बचाव केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवले होते. त्यावरून वनविभागाचा प्रथम अहवाल आला आहे. त्यानुसार वाघिणीला ट्रांगुलाईज केलं की नाही यावर संशय कायम आहे. अवनी वाघिणीच्या डाव्या बाजूला गोळी लागली आणि गोळीचे विष शरीरामध्ये तत्काळ पसरल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याचा अंदाज अवहलामध्ये सादर केला आहे. त्याचबरोबर नागपूरच्या फॉरेंसिक प्रयोगशाळेत वाघिणीचा व्हिसेरा पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.

प्रथम शवविच्छेदन अहवालामधून असे स्पष्ट होते कि, “बुलेट इजेरिंग फुफ्फुस” आणि “हृदय-श्वासोच्छवासाच्या विफलतेमुळे” तिचा मृत्यू झाला, रिपोर्टनुसार अवनी वाघिणीच्या शरीरावर डार्टचे लहान निशाण आहे. डार्ट खोलपर्यंत घुसलेलं नव्हतं,  त्यामुळे अवनीला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केलाच नव्हता. अवनी वाघिणीच्या डाव्या बाजूला गोळी लागल्याने तिचा मृत्यू झाला, तर गोळीचा वेग जास्त असल्याने ती गोळी उजव्या बाजूपर्यंत घुसली होती.

गोरेवाडा बचाव केंद्रात टी 1 वाघिणीच्या प्रथम पोस्ट मार्टम अहवालात टी 1 वाघिणीला ट्रांगुलाईज करण्याचा प्रयत्न झाला नाही, वाघिणीच्या शरीरावर हलकासा डार्टची निशाण आहे, त्याचबरोबर वाघिणीच्या डाव्या बाजूला गोळी लागल्याने आणि गोळीचे विष तत्काळ शरीरात विष पसरले, असे मुद्दे अहवालात नमूद करण्यात आले आहेत. त्याचबरोबर अवनी वाघिणीला मारण्यासाठी वापरण्यात आलेले डोससुद्धा नागपूरच्या फॉरेंसिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *