Sat. May 25th, 2019

अमोल कोल्हे यांच्यावर कार्यकर्ते नाराज शिरुरमध्ये बॅनर

1170Shares

लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी दुपारी दुसरी यादी जाहीर केली. शिरुरमधून अभिनेते  डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आता त्यांच्या उमेदवारीवर शिरूरमधील स्थानिक कार्यकर्ते नाराज आहेत. ‘आम्ही आमची ताकत दाखवणार’ असं थेट आव्हान देणार बॅनर भररस्त्यात लावून कार्यकर्त्यांची नाराजी कोल्हे यांच्यावरील नाराजी व्यक्त केली आहे.एकंदरच कोल्हे यांच्या उमेदवारीला विरोध केल्याचे पहायला मिळत आहे.त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर स्थानिक कार्यकर्त्यांची नाराजी कोल्हे यांची डोकेदुखी ठरू शकते.

अमोल कोल्हे यांच्यावर कार्यकर्ते नाराज

मोल कोल्हेंनी नुकतंच मनगटावरचं शिवबंधन सोडून राष्ट्रावादीमध्ये प्रवेश केला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी दुपारी अमोल कोल्हे यांची शिरुरमधून उमेदवारी  जाहीर केली.

डॉ.अमोल कोल्हेंच्या उमेदवारीवरून  कार्यकर्ते नाराज आहेत.

अमोल कोल्हे यांच्या उमेदवारीला विरोध करणारा हा फलक सध्या फेसबुकवर व्हायरल होत आहे.

‘आम्ही आमची ताकत दाखवणार’ असं थेट आव्हान कार्यकर्त्यांनी  बॅनरच्या माध्यमातून दिला आहे.

‘लांडे साहेबानी अडचणीच्या काळात राष्ट्रवादीला साथ दिली पण आता तुम्हाला योग्य जागा दाखवणार कोल्हेला पाडणार’,असा बॅनर लावण्यात आला आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *