राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरुन पुण्यात फलक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली आहे. दरम्यान, राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरून पुण्यात फलकबाजी करण्यात आली आहे. अयोध्या दौऱ्यावरून राज ठाकरेंना पुणेरी शैलीतून फलकाच्या माध्यमातून टोला लगावण्यात आला आहे. सोयीनुसार आणि सुपारीनुसार पोकळ हिंदुत्त्व, असा उल्लेख फलकावर करण्यात आला आहे.
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरून पुण्यात ठिकठिकाणी फलक लावण्यात आले आहेत. अलका टॉकीज चौक, गुडलक चौक तसेच कोथरुडमधील करिष्मा चौक अशा अनेक भागांमध्ये त्यांनीच रेखाटलेल्या व्यंगचित्रांची आठवण करून देणारे फलक लावण्यात आले आहे. त्यामुळे राज ठाकरेंना अयोध्या दौऱ्यावरून पुणेरी शैलीत उत्तर मिळाले आहे.
या फलकांवर, भाजप रामाचं राजकारण करतंय असल्याचं सांगत लोकांनी रामराज्य मागितले राम मंदिर नव्हे, असा टोला राज ठाकरेंनी लगावला आहे. या पोस्टरवर लिहिलं आहे की, ‘राज ठाकरेंनी स्वत:च काढलेले एक व्यंगचित्र. अशी वेळ कोणावरही येऊ नये. उद्धवसाहेब ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला आणि श्री राम मंदिरला विरोध करुन व्यंगचित्र काढणारे राज ठाकरेंना शेवटी अयोध्येत जावे लागणार आहे. सोयीनुसार आणि सुपारीनुसार पोकळ हिंदुत्त्व.’