पूर्व द्रुतगती मार्गाची चाळण, MMRDA चं दुर्लक्ष!

मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले आहे. मुंबईतील ज्या ठिकाणाहून पूर्व द्रुतगती महामार्ग म्हणजे ईस्टर्न एक्सप्रेस सुरू होतो त्या सायन चुनाभट्टी जवळ तर मोठे मोठे खड्डे झाले आहेत.

MMRDA प्रशासनाच्या अखत्यारीत असलेल्या पूर्व द्रुतगती मार्गाची चाळण झाली आहे.

सायन ते विक्रोळी पर्यंतचा रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य आहे.

8 सप्टेंबर रोज या रस्त्यावर सायन चुनाभट्टी येथे असलेल्या खड्ड्यात दुचाकीवरून जात असलेले पती पत्नी खड्ड्यात पडून गंभीर जखमी झाले आहेत.

विजय गुप्ता आणि सीता गुप्ता असे जखमी पती-पत्नीचे नाव आहे.

ते पूर्व द्रुतगती मार्गावरून कांजूरमार्ग कडे निघाले होते.

परंतु चुनाभट्टी येथे एव्हरड नगर जवळ असलेल्या खड्ड्यात त्यांची दुचाकी आदळली आणि ते दोघेही खाली पडले.

सुदैवाने यात त्यांचे प्राण वाचले असले तरी त्यांना दोघांना ही गंभीर  दुखापत झाली आहे.

या दोघांना ही जवळील सोमय्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

गेले अनेक दिवस या मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणत खड्डे झाले असून ही MMRDA चे अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहेत. मग एखाद्याचे प्राण गेले तर प्रशासनाला जाग येणार का? असा संतप्त सवाल या जखमी पती-पत्नी आणि त्यांचा कुटुंबियांनी केला आहे.

Exit mobile version