कोल्हापूर : जिल्हा परिषदेत सत्तेची समीकरणे बदलणार

कोल्हापूर : राज्यात बदललेल्या सत्ता समीकरणाचा परिणाम आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या चंद्रकांत पाटीलांच्या कोल्हापूर जिल्ह्यातूनच प्रारंभ होणार आहे. त्यामुळे शिवसेना पाठिंबा काढून घेणार असल्याने भाजपला सत्ता गमवावी लागणार आहे.

त्यामुळे महिन्यावर येऊन ठेपलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलंय. कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये सध्या भाजपची सत्ता आहे. भाजपच्या शौमीका महाडीक या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आहेत.

त्यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाल संपणार आहे. त्यामुळे एक महिन्यांनंतर  कधीही जिल्हा परिषदेत अध्यक्ष पदाची निवडणुक होणार आहे. या निवडणुकीत भाजपसोबत त्याचे मित्रपक्ष सोबत राहतात का ? याबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.

जिल्हा परिषदेत सध्या असलेले संख्याबळ

भाजप 14

शिवसेना 10

काँग्रेस 14 

राष्ट्रवादी 11

स्वाभिमानी शेतकरी संघटना  2

ताराराणी आघाडी 3

चंदगड विकास आघाडी 2

जनसुराज्य  6

अशा प्रमुख पक्षांचे संख्याबळ आहे

कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये एकुण 70 सदस्य संख्या आहे. त्यापैकी भाजपाचे 14 सदस्य संख्याअसून मित्रपक्ष पैकी स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनसुराज्य पक्ष , ताराराणी आघाडी, चंदगड युवक आघाडी, आवाडे गट आणि शिवसेनेच्या मदतीने 40 सदस्याचं संख्याबळ एकत्रीत करण्यात यश आलं होत.

पण आता मात्र राज्य पातळीवर घडलेल्या घडामोडीच्या पार्श्वभुमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना, चंदगड युवक आघाडी आणि शिवसेना नेमकी काय भुमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरलय.

Exit mobile version