Sat. Feb 22nd, 2020

पहिल्याच दिवशी साहो चित्रपटाने केला 100 कोटींचा आकडा पार

साहो सिनेमाची आतुरता प्रत्येक प्रेक्षकप्रेमी करत होते. तो आता बॉक्स ऑफिस प्रदर्शित झाला आहे.

साहो सिनेमाची आतुरता प्रत्येक सिनेप्रेमी करत होते. तो आता बॉक्स ऑफिस प्रदर्शित झाला आहे. प्रभास सारखा मोठ्या स्टारने या सिनेमातून बॉलिवूड मध्ये पदार्पण केले आहे. तसंच सिनेमाच्या ट्रेलर वरुन त्यातील ऍक्शनने लोकांची आतूरता अजून वाढवली होती.  तशीच प्रभास आणि श्रध्दा यांची जोडी काय कमाल करते, याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले हाेते. पहिल्याचं दिवशी 104 कोटींची कमाई केली आहे.

देशातील काही भागात तांत्रिक अडचणीमूळे सकाळचे तीन ते चार शो बंद ठेवण्यात आले होते.  त्यामुळे याची कमाई कमी होण्याची शक्यता होती. परंतु तरीही या सिनेमाने चांगली कमाई केली आहे. पहिल्याच दिवशी साहो ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. आता शनिवार आणि रविवारी साहो किती कमाई करतो हे बघण्यासारखं असेल.

आंध्रप्रदेश- तेलंगणा या राज्यात सुमारे 42.2 इतकी कमाई केली आहे. तसेच निजाम मध्ये 14.1 कोटी, कर्नाटक मध्ये 13.9 कोटी, तामिळनाडू मध्ये 3.8 कोटी, केरळ मध्ये 1.2 कोटी एवढी कमाई दक्षिण भारतातून केली आहे. प्रभास हा दक्षिणात्य सिनेमातील सुपरस्टार आहे या भागात त्याची क्रेज आहे.

साहोने चित्रपटगृहावरची कमाई नंतर नेट वरही चांगली कमाई केली आहे. दरम्यान हा सिनेमा लिक झाल्याची बातमी फिरत होती. तरीही या सर्व गोष्टी बाजुला सारत साहो ने पहिल्या दिवशी 100 कोटींचा आकडा पार केला आहे. पहिल्याचं दिवशी 104 कोटींची कमाई केली आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *