Wed. Aug 4th, 2021

तुमचं उत्पन्न 15 हजारापेक्षा कमी आहे?, तर हे वाचा…

Union Minister Piyush Goyal during press conference for Karnataka Vidhan Sabha Election. Express Photo By Prem Nath Pandey 11 May 2018 New Delhi *** Local Caption *** Union Minister Piyush Goyal during press conference for Karnataka Vidhan Sabha Election.

लोकसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या अंतरिम बजेट मधून मोदी सरकारने गरीब कामगारांना मोठं गिफ्ट दिलं आहे. अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी बजेटमध्ये असंगठित क्षेत्रातील श्रमिकांसाठी ‘मेगा पेन्शन’ योजनेची घोषणा केली आहे.

‘प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना’

‘प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना’ अंतर्गत 100 रुपये प्रतिमाह योगदानावर काम करणाऱ्या कामगारांना 60 वर्षं पूर्ण झाल्यानंतर दर महिन्याला 3000 रुपये पेन्शन मिळणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितलंय.

असंघटित क्षेत्रातील 10 करोड कामगारांना रिटायरमेंटनंतर पेंशन मिळण्याची गॅरेंटी दिली आहे.

असंघटित क्षेत्रात मासिक 15 हजारांपेक्षा कमी पगारअसेल, त्यांना या स्कीमचा फायदा होणार आहे.

असंघटित क्षेत्रातील 25 टक्के कामगारांना ‘फायनान्शिअल सिक्युरिटी स्कीम’च्या अंतर्गत फायदा होणार आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे ड्रायव्हर, प्लंबर, इलेक्ट्रिशिअन, घर काम म्हणून काम करणाऱ्या कामगारांना याचा लाभ घेता येणार आहे.

पीयूष गोयल यांनी लोकसभा 2019-20 च्या अंतरिम बजेटच्या वेळेस म्हणाले की, या योजनांमुळे 10 करोड कामगारांना लाभ होणार आहे.

येत्या 5 वर्षांत असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सर्वांत मोठी पेन्शन योजना होऊ शकते.

भारतात जवळपास 50 करोड वर्कफोर्स आहे, ज्यातील 90 टक्के लोकं असंघटित क्षेत्रात काम करतात. या कर्मचाऱ्यांना त्यांचा पगारही वेळेवर मिळत नाही. तसेच पेंशन किंवा हेल्थ इन्शुरन्स सारख्या सोशल सिक्युरिटींचा लाभ मिळत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *