काँग्रेस-राष्ट्रवादी इमानदार असते तर ट्रिपल तलाक बिल मंजूर झाले नसते – प्रकाश आंबेडकर

विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय क्षेत्रात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. दरम्यान प्रकाश आंबेडकारांनी कॉग्रेस आणि राष्ट्रवादीवर हल्लाबोल करत त्यांना अनेक प्रश्न केले आहेत. ते लातूर मध्ये बोलत होते.

काय बोलले प्रकाश आंबेडकर?

सध्या राज्यात एकीकडे दुष्काळी तर दुसरीकडे पूरपरिस्थिती आहे. असे असताना सरकार आणि मुख्यमंत्री शांत आहेत कोणतेच काम करताना दिसत नाहीत.त्याचे मंत्री तर तेथे सेल्फी काढताना आढळून आले. मुख्यमंत्री त्यास घरी पाठवू शकत नाहीत. कुचकामी धोरणे आहेत. अनेक उद्योगधंदे बंद पडत आहेत. वित्तीय तूट हि चाळीस टक्क्यावर आली आहे. बँका बंद पडत चालल्या आहेत. मात्र कुठे ही  उपाययोजना होताना दिसत नाहीत. मात्र हे धर्मवेडे लोक धर्मावर बोलत आहेत. यांना देशाला वाचवायचे असेल तर अर्थनीती वर काम करणे आवश्यक आहे ते सोडून ते सर्व करत आहेत.

बँकांचे विलीनीकरण हे संकटातून बाहेर येण्यासाठी केलेली धडपड आहे. विदेशनीतीची अवस्था ही फार चांगली नाही. चीनसाठी पायघड्या घालताना भाजपा दिसत आहे. मात्र काश्मीर मधील परस्थितीवर चीनने काही दिवसापूर्वी दिलेल्या इशाऱ्याचे पुढे काय झाले? त्यावर भारत सरकारची आणि चीनची काय बोलणी झाली यावर कोणी काहीच बोलत का नाहीत? असे अनेक प्रश्न करत भाजपा काँग्रेस आणि राष्ट्रवादी वर शरसंधान केले आहे.

तसेच मुस्लिम समाजाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रश्न केला पाहिजे की तुम्ही तेथे असताना ट्रिपल तलाक बिल मंजूर कसे होते? भाजपाला शरियत मध्ये हस्तक्षेप करण्याला त्यांनी साथच दिली आहे. मुस्लिम समाजातील विविध संघटनेला का चर्चेला बोलविण्यात आले नाही? या सगळ्या घटनेला भाजपा एवढेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जबाबदार असल्याचे मत प्रकाश आंबेडकर यांनी लातुरात व्यक्त केले आहे.

Exit mobile version