‘राहुल बाबा लिंबं घेऊन गाव गाव फिरतायत’, प्रकाश आंबेडकर यांची राहुल गांधींवर टीका

राहुल गांधी प्रचारात का उतरले हे मला कळत नाही. ते स्वतः आले की मोदींनी त्यांना आणलं, असा टोला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी लगावला. राहुल गांधी हे पोपटपंची करत असल्याची खोचक टीका ही आंबेडकरांनी केली. आज परभणीत होते. वंचितच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी त्यांनी सभा घेतली.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
भाजपला पुन्हा तारायला राहुल आले.
आले तर आले, ते ही राफेल आणले, सहा महिन्यांनंतर कुंभकर्ण झोपेतून निवडणुकीत आले.
राजनाथ सिंग यांनी लिंबं लावली, तर राहुल बाबा लिंबू घेऊन गाव गाव फिरत आहेत.
लिंबू कसं ठेवायचं हे ही राहुल यांना माहीत नाही अशी टीका आंबेडकरांनी केली.
तसंच राफेलबद्दल राहुल गांधी यांना काहीही माहीत नाही. मनमोहन सिंग यांना बोलायला लावा.
मोदींना पाडल्याशिवाय हा माणूस शांत बसणार नाही,
राज्यात एकवेळचं खाऊन झोपणाऱ्यांची संख्या 30% आहे. हे फार मोठं कोडं आहे.
व्यापारी खुश आहेत का?
नाहीत, तर त्यांनी ठरवावं की मी भाजपाला मतदान करणार नाही.
मुस्लिमांसाठी शेवटची संधी!
मुख्यमंत्री म्हणत आहेत 200 जागा येणार आहे, लोकशाहीत हा घमंड नसायला पाहिजे,
मुस्लिम म्हणतात आमचा सगळे वापर करतात.
वंचित मुस्लिमांना सत्तेत समान वाटा देतील.
मुस्लिमांसाठी ही शेवटची संधी असल्याचा इशारा ही आंबेडकरांनी दिला.