MIM सोबत 100 जागा अशी चर्चाच नाही – प्रकाश आंबेडकर
MIM सोबत 100 जागा अशी चर्चाच झाली नाही. अशी कोणतीही मागणी माझ्यापर्यंत पोहचलीच नाही असा खुलासा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.

MIM ने वंचित बहुजन आघाडीकडे 100 जागांची मागणी केली आहे. MIMचे महाराष्ट्र अध्यक्ष इम्तियाज जलील यांनी पत्र लिहून प्रकाश आंबेडकरांकडे ही मागणी केली आहे. अशी चर्चा होत होती. यामुळे आंबेडकरांचं राजकीय गणित बिघडण्याची शक्यता होती. तर आंबेडकरांच्या भूमिकेकडं सर्वांचे लक्ष लागले होतं. MIM सोबत 100 जागा अशी चर्चाच झाली नाही. अशी कोणतीही मागणी माझ्यापर्यंत पोहचलीच नाही असा खुलासा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.
काय म्हणाले आंबेडकर?
काँग्रेस ने आम्ही ऑफर केलेल्या ४० जागा स्वीकाराव्या आमची आघाडी होईल.
एमआयएम सोबत 100 जागा अशी चर्चा नाही. माझ्यापर्यंत ही मागणी पोहचलीच नाही.
विजयी जागा हाच आमचा निकष आहे. असद्दीन ओवैसी यांच्यासोबत माझी चर्चा झाली होती. आमची युती कायम राहणार आहे.
भाजप सरकार पाडतय या प्रश्नावर सरकार पाडण्याची काम काँग्रेसने ही यापूर्वी केली. आता भाजप करतय मात्र भाजप स्लो खेळतंय हा प्रश्न आहे.
माझी आणि ओवेसी यांची बैठक झाली. आपली युती असणार यात निर्णय झाला. अशी कुठली ही मागणी नाही.