Mon. Oct 25th, 2021

“…तर देश चालवायला ब्रिटीशांना बोलवावं लागेल!”

लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्याला काहीच अवधी उरला असल्याने प्रचारसभांनी जोर धरला आहे. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांची आज शिर्डीमध्ये प्रचारसभा पार पडली. या सभेत मोदींशिवाय पंतप्रधान होण्यासाठी पात्र व्यक्ती कोण या प्रश्नावर आंबेडकरांनी उत्तर दिलंय.

शिर्डीमध्ये काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर निशाणा साधत त्यांच्या कार्यक्षमतेवर टीका केली आहे.

पंतप्रधान म्हणून मोदींशिवाय भारतामध्ये पर्याय नाही, या वक्तव्याचा आंबेडकर यांनी समाचार घेतला आहे.

125 कोटी लोकसंख्या असणाऱ्या देशामध्ये पंतप्रधान होण्याच्या लायकीचे कोणीच नसेल तर ब्रिटिशांना बोलवावं लागेल, असं म्हणत मोदींवर ताशेरे ओढले आहेत.

याचवेळेस त्यांनी नोटाबंदी, GST या विषयांवर प्रकाश टाकत त्यांच्या पाच वर्षाच्या कामांवर टीरा केली.

त्याचसोबत पुलवामा हल्ल्याचा मोदींकडून राजकारण झालेले आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *