Fri. Sep 20th, 2019

प्रकाश आंबेडकर यांची काँग्रेस, राष्ट्रवादीवर जोरदार टीका

0Shares

आज पुण्यात वंचित बहुजन आघाडीचा सत्ता संपादन मेळावा आयोजित करण्यात आला होता.यावेळी विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला.

यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली.

राष्ट्रवादी मधील अनेक लोकांना निवडणूक हरण्याची भीती ज्यांना वाटत आहे. ते निवडणूक जिंकता येणार नाही, म्हणून जिंकणारा पक्ष म्हणूण भाजप मध्ये जात आहेत. राष्ट्रवादी व काँग्रेस यांचं अस्तित्व संपतंय.

काँग्रेस राष्ट्रवादी मधील अनेक नेते भाजप मध्ये जात आहेत.

त्यामुळे भाजप चोरांचा पक्ष होतोय का असा प्रश्न निर्माण होतोय.

देशातील आरक्षण धोक्यात आहे.

मुफ्ती महेबुबाचा वापर भाजपने केला आणि कश्मीर ताब्यात घेतलं 2 जी घोटाळा झाला तेव्हा सर्वांनी आवाज उठवला होता.

जेव्हा यातील आरोपी सोडले तेव्हा अण्णा हजारे झोपले होते का, असा प्रश्न अण्णा हजारे यांना आंबेडकरानी विचारलाय.

विधानसभा जागा वाटपाबाबत काँग्रेसबरोबर 2 दिवसात चर्चा करणार आहोत.

आम्ही बाहेच्यांचा विचार करणार नाहीत. आमच्या लोकांना आम्ही मोठं करणार आहोत.

बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिली जाणार नाही, असं त्यांनी आज स्पष्टपणे जाहीर केलं.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *