राष्ट्रपतीपदासाठी डाव्या पक्षांची प्रकाश आंबेडकरांना पसंती
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून डाव्या पक्षांची पहिली पसंती प्रकाश आंबेडकर यांना आहे. आज होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीत सीपीएम प्रकाश आंबेडकरांचं नाव मांडणार आहे.
काँग्रेस आणि इतर उरलेलल्या पक्षांनी प्रकाश आंबेडकर यांच्या नावावर सहमती दिली, तर तेच विरोधी पक्षांतर्फे राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार असतील, असे सीपीएमच्या नेत्यांनी सांगितले.