#CAA, #NRC विरोधात 26 डिसेंबरला धरणं आंदोलन- प्रकाश आंबेडकर

CAA आणि NRC विरोधातील रोष ठीकठिकाणी व्यक्त केला जातोय. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही पत्रकार परिषद घेऊन NRC आणि CAB विरोधात आवाज उठवलाय.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली असताना CAA NRC का आणलं? हा मुद्दा वाढवून सरकार खाजगीकरणाचा मुद्दा मागे पाडला जातोय.

या कायद्यामुळे 40% हिंदू (Hindu) बाधित होणार आहेत.

घटनेच्या नागरिकत्वाविरोधात हे RSSचं नागरिकत्व आहे.

हा फक्त मुस्लिमांचा मुद्दा नाही. भटक्या विमुक्तांकडे कागदपत्रं नाहीत. त्यांना ती मिळू शकणारही नाहीत. आदिवासींकडे रेकॉर्ड्स नाहीत. आलुतेदार,बलुतेदार,गाव गाव भटकणारे मेंढपाळ धनगर यांच्याकडे रेकॉर्ड नाहीत.

RSS, BJP चे कार्यकर्ते आंदोलनात घुसून दंगल घडवत आहेत. विद्यार्थ्यानी सुरू केलेलं आंदोलन त्यांनीच पुढे न्यावं. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत.

महाराष्ट्रात 20 ते 25 लाख लोक राहतील असे डिटेशन कॅम्प बनवले जात आहेत,याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घ्यावी.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे NRC विरोधात असतील, तर त्यांच्या काळात RSS च्या कार्यकर्त्यांना बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण देणारे कॅम्प सुरू केले होते. याचा अहवाल पोलिसांनी दिला होता. तो त्यांनी उघड करावा, असं आव्हान प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) दिलंय.

हिंसा करू नका,जागृती करा – आंबेडकर

26 डिसेंबरला वंचित बहुजन आघाडी आणि इतर सामाजिक संघटना यांच्या वतीने दादर टी टी इथे धरणं आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा आंबेडकर यांनी केली.

जे जे या कायद्यामुळे बाधित होणार आहेत त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहतील.

सर्वोच्च न्यायालयात या विरोधात जाऊ नका, कारण हा राजकीय मुद्दा आहे असं आंबेडकर यावेळी म्हणाले.

ज्या पध्दतीचा माहोल बनवला जातोय त्यामुळे दंगली भडकतील अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.

Exit mobile version