Mon. Oct 19th, 2020

राज ठाकरेंसंदर्भात प्रकाश आंबेडकर यांचं ‘हे’ मोठं विधान!

‘वंचित बहुजन आघाडी’चे समन्वयक प्रकाश आंबेडकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासंदर्भात मोठं विधान केलं आहे. विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे हे किंगमेकर ठरू शकतात, असं प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

लोकसभा निवडणुकीनंतर भाजप- शिवसेना विधानसभा निवडणूक एकत्रच लढवतील.

जागावाटपानंतर शिवसेनेच्या वाट्याला 135 जागा येतील.

त्यामुळे बाकी जागांवर मनसेला संधी आहे.

प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला दिला ‘हा’ सल्ला

ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार नसतील, तेथे मनसेच्या उमेदवारांना संधी आहे.

दोन्ही पक्षांचा मतदार एकाच विचारसरणीचा आहे.

त्याचा फायदा मनसेला होईल. अशी संधी पुन्हा राज ठाकरेंना मिळेल की नाही, सांगता येत नाही.

मनसेला चांगल्या मिळाल्या, तर राज ठाकरे किंगमेकर ठरू शकतात.

राजू शेट्टी आमच्या सोबत आले तर हमखास निवडून येवू – प्रकाश आंबेडकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *