Mon. Oct 19th, 2020

वंचित घटकांना वंचित ठेवण्यासाठी मंदी लादली जातेय- प्रकाश आंबेडकर

देशात मंदी नाही. वंचित घटक हा वंचित राहावे यासाठी राज्य सरकारकडून मंदी लादली जातेय, असा आरोप बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. सत्तासंपादन रॅलीच्या अनुषंगाने आज प्रकाश आंबेडकर लातूरमध्ये दाखल झाले होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर आणि सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

वंचित घटकांचं लक्ष मूलभूत सोई सुविधांवरच रहावं, जेणेकरून समाजाचे लक्ष राजकारणाकडे वेधले जाणार नाही म्हणून मंदी लादल्याचं आंबेडकर यांनी म्हटलंय.

देशात 40 ते 45% लोक दारिद्र्यरेषेखाली असताना मंदी येतेच कशी, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केलाय.

सध्याची बेरोजगारी आणि मंदी म्हणजे अशांतीची त्याची सुरुवात असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वसामान्य जनतेने सतर्क राहणं आवश्यक असल्याचंही त्यांनी म्हटलंय.  विरोधकाच्या नाहीतर सत्ताधार्‍यांच्या भूमिकेत वंचितांनी राहावे या अनुषंगाने तयारीला लागा, असा आदेशही त्यांनी यावेळी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *