मोदींना नोटा रद्द करण्याचा अधिकार कुणी दिला – प्रकाश आंबेडकर

मोदींना भारतीय चलनातील नोटा रद्द करण्याचा अधिकार आला कुठून, असा सवाल करीत मोदी हा डाकू असून देशाचा पंतप्रधान लुटारू आहे. अशी खरमरीत टिका वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.बहुजन वंचित आघाडीचे नेते तथा भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड बाळासाहेब आंबेडकर हे भिवंडीतील जाहीर सभेत बोलत होते. यावेळी एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी,एमआयएमचे आमदार वारीस पठाण उपस्थित होते.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर
भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड बाळासाहेब आंबेडकर यांची भिवंडीत सभा झाली.
भिवंडीतील पाणी प्रश्न तसेच भिवंडीतील डबघाईला आलेल्या यंत्रमाग व्यवसायासाठी आत्तापर्यंत काम झाले नाहूी.
जर गव्हर्नरांच्या सहीने नोटा चालविल्या जातात , मग नोटा रद्द करण्याचा अधिकार मोदींना कोणी दिला.
असा सवाल नरेंद्र मोदी यांना बाळासाहेब आंबेडकरांनी भिवंडीतील सभेत विचारला आहे.
मोदी हा डाकू असून देशाचा पंतप्रधान लुटारू आहे असे ही ते म्हणाले आहेत.
असदुद्दीन ओवेसींची मोदींवर टीका
भारताला इराणकडुन पेट्रोल खरेदीस अमेरीकेने मनाई केली.
त्यावर मोदी अमेरिकेच्या राष्ट्रपतीला म्हणतात ठीक आहे बॉस.
मोदी डरपोक असून ते अमेरिकेला घाबरतात. अन् आम्हाला सांगतात की घरमे घूस के मारेंगे ?
कसली तुमची ५६ इंचाची छाती, आम्ही तर ट्रम्पला तर सोडा कोणाच्या बापालाही घाबरत नाही.
मोदींनी अभिनेत्याला मुलाखत दिली, मोदीच्या मते टिव्ही अॅकर चांगले मुलाखात घेत नाहीत. असा सवाल त्यांनी विचारला.
अक्षय कुमारला नमो टिव्ही चा अॅकर बनवा असं ही ते म्हणाले आहेत.