पंतप्रधानपदासाठी मायावतींना पाठिंबा, मात्र पवारांना नाही – प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडी विधानसभेच्या सर्व जागा स्वतंत्र पणे लढवणार असल्याची भुमिका आज वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केली आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी लोकसभेत जास्त जागांवर निवडून येणार असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानपदासाठी राहुल गांधींपेक्षा मायावतींना पाठिंबा देवू मात्र शरद पवारांना पाठिंबा देणार नाही असं ही त्यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर
विधानसभेला कोणासोबत जाणार नसून सर्वच्या सर्व जागा स्वबळावर लढवणार आहोत.
वंचित बहुजन आघाडी विधानसभेच्या सर्व जागा स्वतंत्र पणे लढवणार आहे.
अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केली आहे.
मोदींचा तोल सुटला असावा म्हणून त्यांनी राजीव गांधींवर टीका केली असं ही ते म्हणाले आहेत.
वैयक्तिक टीका करणे म्हणजे निवडणूक मोदींच्या हातातून निसटत चालल्याचे निदर्शक आहे.
पंतप्रधानपदासाठी राहुल गांधींपेक्षा मायावतींना पाठिंबा देवू मात्र शरद पवारांना पाठिंबा देणार नाही.