Sun. Jun 7th, 2020

आता सिनेमा आणि मालिकांचे टायटल स्थानिक भाषेतही – प्रकाश जावडेकर

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने टीव्ही चॅनलसाठी नवीन आदेश जारी केले आहे. या आदेशानुसार, भारतीय भाषांचा प्रचार वाढवणे महत्वाचे असल्याचे म्हटलं जात आहे. या निर्णयामुळे सिनेमा आणि टीव्ही मालिकांच्या सुरूवातीला आणि शेवटी स्थानिक भाषेत स्क्रोल जाणे आवश्यक असल्याचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले आहे.

काय आहेत नवीन आदेश ?

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी टीव्ही चॅनलसंदर्भात नवीन आदेश जारी केला आहे.

आतापर्यंत सिनेमा आणि टीव्ही मालिकांचे टायटल इंग्लिशमध्ये जात आहे.

मात्र भारतीय भाषेंना प्रसिद्धी आणि ओळख मिळण्यासाठी सगळ्या टीव्ही चॅनलने स्थानिक भाषेत टायटल देणे आवश्यक असल्याचे म्हटलं आहे.

भारतीय भाषेसोबत इंग्लिशमध्ये क्रेडिट देण्यासाठी टीव्ही चॅनलला स्वतंत्र असल्याचे प्रकाश जावडेकरांनी स्पष्ट केले आहे.

आम्हाला कुठल्याही गोष्टीवर आक्षेप नसून फक्त भारतीय भाषेला प्रसिद्धी मिळावी म्हणून करत असल्याचे म्हटलं आहे.

त्यामुळे आतापासून टीव्ही चॅनलला सिनेमा आणि टीव्ही मालिकांच्या सुरूवातीला आणि शेवटी स्थानिक भाषेत स्क्रोल जाणे आवश्यक आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *