Tue. Oct 19th, 2021

गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता अडचणीत

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. विद्याविहारमध्ये तानसा तलावाच्या पाईपलाईनवर वसलेल्या झोपडपट्ट्या हटवण्याची कारवाई सुरू केलेली असताना गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांनी कारवाई रोखत कारवाई करण्यास विरोध केल्याने मुंबई पालिकेने मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले.

 

तानसा, वैतरणा या तलावाचे पाणी पाईपलाईनद्वारे बीएमसी मुंबईकरांना पुरवते. मात्र या पाण्याच्या पाईपलाईनवर कित्येक ठिकाणी झोपड्या बांधून अतिक्रमण करून पाण्याची चोरी मोठ्या प्रमाणात होत असते.

 

पाणी चोरी आणि अतिक्रमणविरोधात दाखल याचिकेवर उच्च न्यायालयाने पाण्याच्या पाईपलाईनच्या दोन्ही ठिकाणी 10 मीटर पर्यंतची जागा सुरक्षित आणि मोकळी करण्याचे आदेश दिले होते.

 

विद्याविहारमध्ये 15 एप्रिलला पाईपलाईन लगतच्या झोपड्या तोडण्यासाठी बीएमसीचे पथक गेले असता, प्रकाश मेहतांनी तोडक कारवाईस मनाई केली. त्यामुळे न्यायालयाचा अपमान झाला असून, त्यांच्याविरोधात कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *