Jaimaharashtra news

विधानसभा निवडणुका EVM नव्हे, बॅलेटवर घ्याव्या- प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखाली वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रभर ‘EVM हटाव, देश बचाव’ आंदोलन पुकारण्यात आलं. राज्यातील सर्व जिल्हा आणि तालुका मुख्यालयांसमोर हे आंदोलन करण्यात आलं. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा पराभव झाला असला आणि युतीला विजय मिळाला असला, तरी मतमोजणीच्या आकडेवारीत तफावत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

EVM विरोधात आंदोलन!

Evm विरोधात आज भारिप बहुजन महासंघ आणि वंचित आघाडी कडून जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात आलं.

नुकत्य़ाच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत जवळपास 22 ठिकाणी EVM च्या टोटल आणि निवडणूक निर्वाचन अधिकारी यांच्या टोटल मध्ये फरक दिसून आला. 

त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरवर करावे अशी मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली.

यावेळी ‘EVM हटाव, लोकतंत्र बचाव’ अशा घोषणा देण्यात आल्या.

लोकसभा निवडणुकीत आढळून आलेल्या ताफवातीचा खुलासा प्रकाश आंबेडकरांनी निवडणूक आयोगाला 15 दिवसात देण्यास सांगितलं आहे.

निवडणूक आयोगाने समाधानकारक उत्तर नाही दिल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांकडून देण्यात आला.

Exit mobile version