Wed. Aug 10th, 2022

गोव्यात प्रमोद सावंत विजयी

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत विजयी झाले आहेत. साखळी मतदार संघातून प्रमोद सावंत ५०० मतांनी विजयी झाले आहेत. गोवा विधानसभा निवडणुकीच्या मतमोचणीच्या सुरुवातील प्रमोद सावंत पिछाडीवर होते. मात्र, त्यानंतर सावंत यांनी जोरदार मुसंडी मारत साखळी मतदार संघात ५०० मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

उत्पल पर्रीकरांचा पराभव

पणजी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार उत्पल पर्रिकर यांचा ८०० मतांनी पराभव झाला आहे. भाजपचे उमेदवार बाबूश मोन्सेरात यांनी उत्पल पर्रिकर यांचा पराभव केला आहे. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे उत्पल पर्रिकर यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. मात्र, पणजी मतदारसंघामध्ये उत्पल पर्रिकर यांचा पराभव झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.