Wed. Jun 19th, 2019

EVM मधील छेडछाडीची मला चिंता वाटते – प्रणव मुखर्जी

0Shares

2019 च्या लोकसभा निवडणुकांसाठीचे मतदान पार पडले आहे. प्रणव मुखर्जी यांनी गेल्या काही दिवसात निवडणुक प्रक्रिया सुरळीत पार पाडल्याबद्दल निवडणुक आयोगाचे कौतुक केले होते.परंतु आज त्यांनी ईव्हीएम वादात उडी घेतली आहे. ईव्हीएमच्या सुरक्षेची जबाबदारी ही निवडणूक आयोगाची आहे परंतु तरीही याबद्दल चिंता वाटत आहे असं मत त्यांनी व्यक्त केले आहे. प्रत्येक निवडणूक आयुक्तांनी योग्य पद्धतीने निवडणुका घेतल्यामुळे भारतात लोकशाही यशस्वी ठरली अशी प्रशंसा केल्यानंतर त्यांनी पुन्हा चिंता व्यक्त केली आहे.

काय म्हणाले प्रणव मुखर्जी?

ईव्हीएम बरोबर छेडछाड केला असल्याची आरोप सतत विरोधकांमध्ये होत आहे.

यावरून केंद्र सरकार आणि विरोधक यांच्यातील आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत.

मतदारांनी या छेडछाडी संदर्भात कौल दि्ल्याने मला चिंता वाटत असल्याच त्यांनी म्हटलं आहे.

निवडणूक आयोगाच्या ताब्यात असणाऱ्या ईव्हीएमच्या सुरक्षेची जबाबदारी आयोगाची आहे.

प्रसिध्दी पत्रक काढून प्रणव मुखर्जी यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

 


 

निवडणूक आयोगाची प्रशंसा

निवडणूक आयोगाने अत्यंत योग्य पद्धतीने २०१९ च्या लोकसभा निवडणुका घेतल्या.

सुकूमार सेन यांच्यापासून ते विद्यमान निवडणूक आयुक्तांपर्यंत सर्वांनीच चांगले काम केले.

निवडणुका चांगल्या पद्धतीने घेतल्यामुळे भारतात लोकशाही यशस्वी ठरली.

अशा शब्दात त्यांनी निवडणुक आयोगाची प्रशंसा केली होती.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: