Wed. Dec 1st, 2021

विरोधात आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींना सरकार मेंटली टॉर्चर करतं- प्रणिती शिंदे

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी 2 जानेवारी 2018 रोजी जिल्ह्याधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना घेराव घातला होता. त्यामुळे त्यांच्या सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्या अनुषंगाने सोलापूर न्यायालयात खटला चालू असताना खटल्याच्या तारखेला हजर न राहिल्याने आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात जामिनपात्र वॉरंट काढलंय.

त्यानंतर शिंदे न्यायालयात हजर झाल्यावर न्यायालयाने त्यांना अंतरिम जामिन मंजूर करत न्यायालयाने 3 दिवस म्हणजे 16 ते 18 तारखे पर्यंत सदर बझार पोलिस ठाण्यात चौकशी हजर राहण्याचे आदेश दिले होते.

त्या आदेशाचे पालन करून प्रणिती शिंदे यांनी चौकशीसाठी कॉग्रेस कार्यकर्त्यांसह सदर बझार पोलीस ठाण्यात हजेरी लावली आहे.

काय म्हणाल्या प्रणिती शिंदे?

सोलापुरातील शासकीय रुग्णालयात औषधाचे दर संदर्भात आम्ही आंदोलन केलं होतं.

त्यावर माझ्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते.

माझ्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तरी गोरगरीबांसाठी मी नेहमीच लढा देत राहीन.

सरकारच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींना हे सरकार मेंटली टॉर्चर करत आहे, अशी टीका प्रणिती शिंदे यांनी यावेळी केलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *