‘संजय राऊत मुघलांची औलाद’ प्रसाद लाड यांचा हल्लाबोल

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी छत्रपती उदयनराजे यांच्या शिवछत्रपतींच्या वंशज असण्यावरून केलेल्या वक्तव्यावरून चांगलाच गदारोळ माजला आहे. राऊत यांच्या वक्तव्यामुळे साताऱ्यातील जनाता संतापली आहे.
शिवाजी महाराजांच्या घराण्याचा अपमान केल्यामुळे साताऱ्यातील पोवई नाका परिसरात आंदोलन करण्यात येत आहे. राजवाडा येथील गांधी मैदानावर छत्रपती उदयनराजे यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात जमणार आहेत.
तसंच भाजप आमदार राम कदम यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
आमदार प्रसाद लाड यांनी सायन पोलीस स्टेशनबाहेर उपोषणाला बसणार असल्याचं जाहीर केलंय.
काय म्हणाले प्रसाद लाड?
संजय राऊत त्यांचं आडनाव बदलून खान करणार असावेत.
छत्रपतींच्या विरोधात बोलणारे राऊत हे मुघलांची औलाद आहे.
छत्रपतींच्या आशीर्वादाने बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली. त्याच पक्षाचे खासदार छत्रपतींच्या वंशजांचे पुरावे मागत आहेत.
याचाच अर्थ ते सत्तेसाठी लाचार असलेली मुघलांची औलाद आहेत.