Tue. Jan 18th, 2022

प्रसाद लाड यांचे पोलीस ठाण्यात आंदोलन

संगमेश्वर:  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाल्यानंतर संगमेश्वर मधील राणे समर्थक आक्रमक झाले आहेत. नारायण राणे यांची सुटका होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार अशी भूमिका भाजप कार्यकर्त्यांनी घेतली आहे.

साहेबांना सोडा, साहेबांना तुम्ही मारणार आहात. त्यांच्या जीवाला धोका आहे. आम्हाला एसपींना भेटू द्या. आम्हाला आदेश दाखवा नाहीतर येथे उपोषणाला बसू. असा पवित्रा भाजप नेते प्रसाद लाड यांनी पोलिस ठाण्यातच घेतला.नारायण राणे यांना अटक झाल्यानंतर त्यांच्यासोबत त्यांचे दोन्ही मुले पोलीस ठाण्यातच आहेत.

यावेळी कोणत्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. आम्हाला विचारण्याचा अधिकार आहे की नाही, आम्हाला आदेश दाखवा. असे निलेश राणे म्हणाले.संगमेश्वर मध्ये रस्त्यावर भाजपचे समर्थक उतरले आहेत. रत्नागीरीत कोणालाही जाऊ देणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. जोपर्यंत त्याची सुटका होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार अशी भूमिका राणे समर्थकांनी घेतली आहे.

यावेळी प्रसाद लाड म्हणाले की, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नुसतेच बसवून ठेवले आहे. ना कुठली कारवाई करत आहेत ना कसली माहिती देत आहेत. गोळवली प्रकल्पात नारायण राणे यांना पोलिसांनी भरल्या ताटावरून जेवताना अर्धवट उठवले. ज्या अधिकाऱ्यांनी एफआयआर केला असे सांगितले जाते, ते पोलिस स्थानकात उपस्थित नाहीत. पोलिस सहकार्य करत नसल्याने आता पोलीस ठाण्यात उपोषणाला बसणार असे ही म्हणाले. नारायण राणे यांची सुटका होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *