Tue. Aug 9th, 2022

प्रशांत किशोर यांनी काँग्रेसचा प्रस्ताव नाकारला

राजकीय नेते प्रशांत किशोर यांनी काँग्रेसचा प्रस्ताव नाकारला आहे. प्रशांत किशोर आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते रणदीप सुरजेवाल यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.

प्रशांत किशोर यांचे ट्विट

प्रशांत किशोर यांनी ट्विट केले की, ‘मी ऍगच्या रुपात काँग्रेस पक्षात सहभागी होण्याचा तसेच निवडणुकांची जबाबदारी घेण्याचा प्रस्ताव नाकारला आहे. काँग्रेसला रचनात्मक सुधारणांची गरज असून जास्त सामूहिक इच्छाशक्तीही काँग्रेसमध्ये बदल घडवू शकते.’

रणदीप सुरजेवाला यांचे ट्विट

काँग्रेसचे वरिष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट केले की, ‘प्रशांत किशोर यांच्यासोबत आमची बैठक पार पडली. काँग्रेस अध्यक्षांनी लोकसभा निवडणूक २०२४साठी समिती गठीत केली आहे. प्रशांत किशोर यांना पक्षात सहभागी होण्यासाठी त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवण्यात आला  होता. मात्र, प्रशांत किशोर यांनी काँग्रेसचा प्रस्ताव नाकारला आहे.’

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.