Wed. Jun 26th, 2019

नरेंद्र मोदी अजूनही लोकप्रिय नेते – प्रशांत किशोर

0Shares

‘मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये झालेला पराभव भाजपासाठी धोक्याची घंटा नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी अजूनही देशातील सर्वाधिक लोकप्रिय नेता आहेत’ असे ‘जेडीयू’चे नेता प्रशांत किशोर हे म्हणाले आहेत.

तसेच 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या निवडणूक प्रचारात अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावणारे प्रशांत किशोर यांनी भाजपा राम मंदिराच्या मुद्द्याशिवायही निवडणूकीत विजय मिळवू शकते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. भाजपा राम मंदिराच्या मुद्द्याशिवायही निवडणूक जिंकू शकते, निवडणुका जिंकण्यासाठी भाजपाने केवळ विकासाचा मुद्दा धरुन ठेवला तरी त्यांना यश मिळेल असे किशोर यांनी म्हटले आहे.

प्रशांत किशोर पुढे म्हणाले की, भाजपा 2014 च्या निवडणुकीवेळी जेवढी ताकदवान होती आज तेवढी ताकदवान नसली तरी 2004 मध्ये ज्यावेळी ते निवडणूक हारले होते त्यापेक्षा नक्कीच जास्त ताकदवान आहे. 2009 मध्ये काँग्रेसकडून पराभव झाला होता त्यापेक्षाही भाजपाची ताकद आता जास्तच आहे.

भाजपासोबत मी 2014 मध्ये जोडला गेलो होतो, त्यावेळी राम मंदिराचा अजेंडा नव्हता तरीही भाजपाने त्यांचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन केले आणि विजय मिळवला, त्यामुळे राम मंदिराच्या मुद्द्याशिवायही भाजपा निवडणूक नक्कीच मिळवू शकते’, असं त्यांनी म्हटलं आहे.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: