Mon. Jan 24th, 2022

प्रताप सरनाईक यांना शुल्क माफी देण्याचा वाद पेटणार

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना शुल्क माफी देण्याचा वाद पुन्हा पेटणार आहे. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त आर. ए. राजीव यांनी प्रताप सरनाईकांचे ठाण्यातील छाबय्या विहंग गार्डन गृहसंकुलाचे बांधकाम बेकायदेशीर ठरविले होते. मात्र राज्य सरकारने दंड माफ करत न्याय दिला असल्याचा दावा आमदार प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. दरम्यान, एक इंचही बांधकाम अनधिकृत नाही आणि असे असेल तर आमदार पदाचा राजीनामा देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नगरविकास खाते होते, त्यावेळी नगरविकास खात्याने विहंग गार्डनमध्ये कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम झाले नसल्याचे स्पष्ट झाले होते. तसेच यावर पालिका स्तरावर निर्णय घेण्याचेही यावेळी सांगण्यात आले होते, असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे.

याविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, राज्यात दंडवसुली व्हायलाच हवी. अनियमितता टाळण्यासाठी दामदुप्पट दंडवसुली करा. दंड हा ठाणे महापालिकेचा आर्थिक स्त्रोत आहे. मनपाचा तोटा हा अप्रत्यक्ष राज्य सरकारचा तोटा असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. निर्णयाचा गैरवापर होऊ शकतो. त्यामुळे आर्थिक निर्णय काळजापूर्वक व्हावेत, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *