Wed. Oct 5th, 2022

बदलापुरच्या छायाचित्रकाराला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

वाशिंग्टन येथील स्मिथसनियन नियतकालिकेचा प्रतिष्ठेचा मानला जाणारा पुरस्कार यंदा बदलापुरातील प्रथमेश घडेकर याने पटकावला आहे. स्मिथसोनियन नियतकालिकेच्या आंतरराष्ट्रीय छायाचित्र स्पर्धेत जागतिक निसर्ग गटात प्रथमेश घडेकर याला प्रथम पारितोषिक मिळाले आहे. त्याने मुंगी आणि किटक यांच्या परस्परावलंब जिवनाचा संबंध आपल्या छायाचित्रातून मांडला आहे.

स्मिथसोनियन संस्था ही ऐतिहासिक वारसा, शिक्षण आणि संशोधन या क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असून अमेरिकन सरकारकडून तिची स्थापना झाली आहे. वॉशिंग्टन येथून स्मिथसोनीयन नियतकालिक १९७० पासून प्रकाशित होते आहे. याच नितयकालिकाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय छायाचित्र स्पर्धेचे आयोजन केले जाते. गेल्या वर्षाच्या अखेरीस या स्पर्धेसाठी छायाचित्र मागवण्यात आले होते. यात जगभरातून चाळीस हजार स्पर्धकांकडून छायाचित्र दाखल करण्यात आले होते. यातून विविध गटात आठ विजेते निवडण्यात आले आहेत. त्यात जागतिक निसर्ग गटात बदलापुरच्या प्रथमेश घडेकर याला प्रथम पारितोषिक जाहीर झाले आहे. छायचित्र क्षेत्रातील प्रथमेशच हे विसावे पारितोषिक असून आंतरराष्ट्रीय स्तरावरच हे आठवे पारितोषिक आहे.

प्रथमेश घडेकर यास मिळालेल्या पुरस्काराने बदलापुरच्या छायाचित्र क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. बदलापुर आणि परिसरातून प्रथमेशच्या या यशाबद्दल त्याचे कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.