Sat. Oct 1st, 2022

मुंबै बँक प्रकरणी प्रवीण दरेकर पोलीस स्थानकात दाखल

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मुंबै बँक प्रकरणी पोलिसांनी नोटीस बजावली आहे. त्यानंतर प्रवीण दरेकर मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्थानकात दाखल झाले असून पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरू झाली आहे. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली असून दरेकरांच्या बाजूने घोषणाबाजी सुरू आहे.

प्रवीण दरेकर मजूर नसतानाही याच प्रवर्गातून मुंबै बँकेच्या संचालकपदाची निवडणूक लढवून २० वर्षे सरकारची फसवणूक केल्याचा आरोप दरेकर यांच्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी आम आदमी पार्टीच्यावतीने धनंजय शिंदे यांनी प्रवीण दरेकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

काय आहे प्रकरण?

प्रवीण दरेकर यांनी मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मजूर वर्गातून निवडणूक लढवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. प्रवीण दरेकर यांची बँकेवर संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली होती. मात्र, सहकार विभागाने प्रवीण दरेकर यांना मजूर म्हणून अपात्र ठरवले आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी प्रवीण दरेकर यांना नोटीस बजावली असून त्यांच्यावर माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.