मुंबै बँक प्रकरणी प्रवीण दरेकरांची चौकशी

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची मुंबै बँक प्रकरणी रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात चौकशी पूर्ण झाली आहे. दरम्यान, १२ एप्रिल रोजी मंगळवारी प्रवीण दरेकर यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.
मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी २० वर्ष सरकारची फसवणूक केल्याचा आरोप दरेकरांवर करण्यात आला आहे. याप्रकरणी आम आदमी पार्टीच्यावतीने धनंजय शिंदे यांनी प्रवीण दरेकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.
काय आहे प्रकरण ?
प्रवीण दरेकर यांनी मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मजूर वर्गातून निवडणूक लढवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. प्रवीण दरेकर यांची बँकेवर संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली होती. मात्र, सहकार विभागाने प्रवीण दरेकर यांना मजूर म्हणून अपात्र ठरवले आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी प्रवीण दरेकर यांना नोटीस बजावली असून त्यांच्यावर माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.