Tue. Sep 27th, 2022

कॉंग्रेस-राष्ट्रवादीला मोठा धक्का; प्रवीण छेडांसह भारती पवार भाजपात

आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांसह राजकीय नेतेही सज्ज झाली आहेत. गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेस- राष्ट्रवादीमधून अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी इतर पक्षात प्रवेश करत असल्याचे समजते आहे. डॉ सुजय विखे- पाटली यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीचे रणजितसिंह मोहिते-पाटील, राष्ट्रवादीच्या उपाध्यक्ष भारती पवार आणि आता मुंबई महापालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते प्रवीण छेडा यांनी भाजपात प्रवेश केला आहे. भाजपाने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केल्यानंतर सुजय विखे- पाटील यांना अहमदनगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

कॉंग्रेस-राष्ट्रवादीला धक्का –

डॉ सुजय विखे-पाटील यांनी काही दिवसांपूर्वी भाजपात प्रवेश केला.

त्यानंतर कॉंग्रेस- राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

राष्ट्रवादीचे रणजितसिंह विखे-पाटील यांनी भाजपात प्रवेश केला.

आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उपाध्यक्ष भारती पवार आणि मुंबई महापालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते प्रवीण छेडा यांनी भाजपामध्ये पक्षप्रवेश केला.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.

अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादी-कॉंग्रेसला आगामी निवडणुकीत याचा फटका बसेल का ? असा पश्न उपस्थित होत आहे.

तसेच आज दिल्लीत माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने सुद्धा भाजपात प्रवेश केला आहे.

यामुळे आगामी निवडणुकीत काय होईल ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.