Thu. May 6th, 2021

‘निष्काळजीपणाने अजून किती बळी घेणार आहात?’

नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनअभावी २२ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. ऑक्सिजन टाकीला गळती झाल्याने ही दुर्घटना घडली. रुग्णालयात १५० रुग्ण दाखल होते. यामधील व्हेंटिलेटरवर असणाऱ्या २३ जणांपैकी २२ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत असून कारवाईची मागणी केली जात आहे. विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी निष्काळजीपणाने अजून किती बळी घेणार आहात? अशी विचारणा केली आहे.

‘निष्काळजीपणाने अजून किती बळी घेणार आहात? नाशिकच्या रुग्णालयात झालेली ऑक्सिजन टँकर गळती दुर्दैवी असून याबाबत आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. घटनेला जबाबदार असणार्‍यांवर त्वरित कारवाई करून अशा घटना पुन्हा घडू नयेत याची काळजी घेण्यास सांगितलं’, असं प्रवीण दरेकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. दरम्यान याआधी दरेकरांनी त्यांनी मनपा आयुक्तांविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीदेखील केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *