Mon. Jul 13th, 2020

सहाय्यक पोलीस निरिक्षक ते रॅम्पवॉक; प्रेमा पाटील ठरल्या ‘रिनिंग मिसेस इंडिया’

खाकी वर्दी, हातात पोलिसांची काठी किंवा पिस्तुल घेऊन नेहमीच सर्तक राहणारे पोलीस नेहमीच आपल्या डोळ्यासमोर येतात. मात्र पुणे येथील पोलीस शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी पोलिसांकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलला आहे. प्रेमा पाटील यांच्या हातात पोलिसांची काठी किंवा पिस्तुल नसून सौंदर्य स्पर्धेचा पुरस्कार आहे. तर पोलिसांची खाकी वर्दी आणि टोपी नसून सौंदर्य स्पर्धेचे मुकुट आहे. प्रेमा पाटील यांनी ‘रिनिंग मिसेस इंडिया’ 2019 या स्पर्धेचा किताब पटकावला आहे.

प्रेमा पाटील ठरल्या ‘रिनिंग मिसेस इंडिया’च्या विजेता –

पुणे येथील पोलीस शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून प्रेमा पाटील कार्यरत आहेत.

फेसबुकवर रिनिंग मिसेस इंडिया 2019 सौंदर्य स्पर्धा होत असल्याची माहिती प्रेमा पाटील यांना मिळाली.

काही एक विचार न करता प्रेमा पाटील यांनी आपले नाव या स्पर्धेसाठी नोंदविले.

पोलीस परेडमध्ये चालण्याची सवय असल्यामुळे रॅम्पवर कसं चालणार असा प्रश्न प्रेमा पाटील यांना उपस्थित झाला.

मात्र या सगळ्या गोष्टींवर मात करत नृत्य आणि बुद्धीच्या बळावर प्रेमा पाटील यांनी हा किताब पटकवला आहे.

पुण्यातील बारणेर येथील एका तारांकित हॉटेलमध्ये रिनिंग मिसेस इंडिया ही सौंदर्य स्पर्धा पार पडली.

समाजातील इतर घडामोडींची माहिती आणि अवांतर वाचन असल्यामुळे त्यांना या स्पर्धेचे मानकरी ठरवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *