Sat. Oct 1st, 2022

राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी

सर्वांना प्रतिक्षा असलेला मान्सून अखेर मुंबईत दाखल झाला आहे. हवामान विभागानं याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान, मुंबई, उपनगर आणि परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं वाढत्या उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. रात्री झालेल्या वादळी पावसामुळं अनेक ठिकाणी वीज पडल्याच्या घटना देखील झाल्या आहेत. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळं झाडं उन्मळून पडली असून, वीजेचं खांब देखील पडले आहेत.राज्याच्या विविध भागात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. मुंबई आणि उपनगरासह, पुणे, नाशिक, कोल्हापूर, जळगाव, वाशिम, अहमदनगर, परभणी, चंद्रपूर, वाशिम अकोला, यवतमाळ या जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. या पावसामुळं नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे.

धुळ्यात पहिल्याच पावसात दाणादाण

धुळे जिल्ह्यात पहिल्याच पावसाने प्रचंड नुकसान केले आहे. अनेक झाडं उन्मळून पडले आहेत, तर महावितरणचे अनेक खांब आहेत कोलमडले. जिल्ह्यातील पिंपळनेर परिसरात पावसाने सर्वाधिक नुकसान केले आहे. या भागांमध्ये वीज पुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अनेक मातीच्या आणि पत्र्याच्या घरांचे ही या पहिल्या पावसाने नुकसान केले आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने या परिसरात दाणादाण उडवून दिली होती.

बुलडाणा जिल्ह्यात बरसल्या पावसाच्या सरी

बुलडाणा जिल्ह्यातील बुलडाणा, खामगाव, नांदुरा,शेगाव, मलकापूर सह जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळल्याने वातावरणात गारवा आला असून या पडलेल्या पावसाने शेतकरी वर्ग कामाला लागला आहे.. उशिरा का होई ना मात्र पाऊस जिल्ह्यात बरसला असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.