Tue. Sep 28th, 2021

प्रत्येक व्यक्तिला मजबूत करणे हेच सरकराचे ध्येय – राष्ट्रपती

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मतदाना झाले असल्याचे म्हणत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मतदारांचे आभार मानले. तसेच निवडून आलेल्या खासदारांसह निवडणूक आयोगाच्या कामकाजाचेही अभिनंदन केले. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्तसमोर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अभिभाषण केले. त्याचबरोबर अनेक गोष्टींबाबत भाष्य केले आहे.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील ठळक मुद्दे –

जनतेच्या सरकारला विकासाठी जनादेश.

देशवासियांनी मूलभूत सुविधांसाठी दीर्घकाळ प्रतिक्षा केली.

प्रत्येक व्यक्तिला मजबूत करणे हे सरकारचे ध्येय असल्याचे राष्ट्रपतींनी म्हटलं आहे.

ग्रामिण भारत मजबूत होईल, शहरी भारत सशक्त होईल असा दावा त्यांनी केला आहे.

तीन अठवड्यांमध्ये सरकारने अनेक महत्तवाचे निर्णय घेतले.

तसेच भ्रष्टाचार होणार नाही आणि सर्व व्यवस्था पारदर्शक असतील असेही त्यांनी म्हटलं आहे.

जवानांच्या मुलांच्या शिष्यावृत्तीच्या रक्कमेत वाढ करणार आहे.

2014 नंतर विकासाला पुढे नेण्याचा जनादेश.

2022पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार.

शेतकऱ्यांची 50 लाख कोंटींची तरतूद करणार.

3 कोटी छोट्या दुकानदारांना पेन्शन मिळणार.

मत्स्य उत्पादनात भारत जगात दुसऱ्या स्थानावर.

बॅंकींग सेवा नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू आहे.

नव्या जलमंत्रालयाची स्थापना म्हणजे जल नियोजनाच्या दृष्टीने पाऊल.

टपाल विभागाला बॅंकिंग यंत्रणेशी जोडणार.

उज्जवला योजनेअंतर्गत महिलांसाठी अनेक सुविधा.

26 लाख गरिबांना योजनेचा फायदा मिळाला.

1 लाख 15 हजार गावांमध्ये पायाभूत सुविधांवर भर देणार.

तिहेरी तलाक आणि हलाला प्रथेच्या विरोधात पाऊल उचलली.

जलसंवर्धन आणि जलसंरक्षण आगामी काळात महत्वाचे.

आगामी काळात जलसंकट होण्याची शक्यता .

50 कोटी गरिबांसाठी आयुष्मान योजना लागू.

राष्ट्र महामार्गामध्ये वेगाने वाढ.

80 देशांबरोबर भारताने करार केली आहेत.

गेल्या पाच वर्षात वृक्ष लागवडीवर भर दिला.

नमामी गंगे योजनेद्वारा गंगा स्वच्छतेवर भर .

मजबूत ग्रामीण अर्थव्यवस्थेवरच देशाची अर्थव्यवस्था अधारित.

कावेरी, गोदावरी, नर्मदा प्रदुषणमुक्त करणार.

उडान हवाई योजनेअंतर्गत देशातील छोट्या शहरांना हवाई मार्गाने जोडणार.

भारातातील महागाई दर कमी झाली असा संपूर्ण दावा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केला आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *