Thu. Sep 29th, 2022

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी सोहळा

भारताच्या दुसऱ्या महिला द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. देशाच्या १५व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. सकाळी साडेदहा वाजता संसद भवनात शपथविधीचा कार्यक्रम पार पडला आहे. भारताचे सरन्यायाधीश एन.व्ही. रमण्णा यांनी द्रौपदी मुर्मू यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत यशवंत सिन्हा यांचा पराभव करत द्रौपदी मुर्मू विजयी झाल्या होत्या. द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती होणाऱ्या पहिल्या आदिवासी महिला ठरल्या आहेत. द्रौपदी मुर्मू यांनी शपथविधीनंतर भाषण केले.

द्रौपदी मुर्मू आपल्या भाषणात म्हणाल्या, ‘स्वतंत्र भारतात जन्मलेली मी देशाची पहिली राष्ट्रपती देखील आहे. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी स्वतंत्र भारतातील नागरिकांकडून आपल्याकडून ज्या अपेक्षा ठेवल्या होत्या त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला या अमृत कालामध्ये वेगाने काम करावे लागेल. या २५ वर्षांत अमृतकाल प्राप्तीचा मार्ग दोन मार्गांवर पुढे जाईल. प्रत्येकाचे प्रयत्न आणि प्रत्येकाचे कर्तव्य आहे. द्रौपदी मुर्मू भाषणात पुढे म्हणाल्या, ‘२६ जुलै हा कारगिल विजय दिवसही आहे. हा दिवस भारतीय सैन्याच्या शौर्य आणि संयम या दोन्हींचे प्रतीक आहे. आज मी कारगिल विजय दिवसानिमित्त देशाच्या सैन्याला आणि देशातील सर्व नागरिकांना माझ्या शुभेच्छा देते.

द्रौपदी मुर्मू म्हणाली, माझा जन्म ओडिशातील आदिवासी गावात झाला. पण देशाच्या लोकशाहीनेच मला इथपर्यंत पोहोचवले. ओडिशातील एका छोट्या आदिवासी गावातून मी माझा जीवन प्रवास सुरू केला. मी ज्या पार्श्‍वभूमीतून आले आहे, सुरुवातीचे शिक्षण घेणे हे माझ्यासाठी स्वप्नासारखे होते. पण अनेक अडथळे येऊनही माझा निश्चय पक्का राहिला आणि मी कॉलेजला जाणारी माझ्या गावातील पहिली मुलगी ठरले. गरीब घरात जन्मलेली मुलगी, दुर्गम आदिवासी भागात जन्मलेली मुलगी भारताच्या सर्वोच्च घटनात्मक पदापर्यंत पोहोचू शकते हे आपल्या लोकशाहीचे सामर्थ्य आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.