Mon. Jul 4th, 2022

माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची राज्यसभेवर नियुक्ती

माजी सरन्यायाधीश असलेल्या रंजन गोगोई यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. केटीएस तुलसी यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने रंजन गोगोई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रंजन गोगोई यांची राज्यसभेवरील नियुक्ती ही राष्ट्रपतींकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात एक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

रंजन गोगोई यांच्याबद्दल थोडक्यात

रंजन गोगोई हे भारताचे 46 वे सरन्यायाधीश होते. माजी सरन्यायाधीश राहिलेले रंजन गोगोई हे मूळचे आसामचे आहेत. तसेच रंजन गोगोई हे आसामचे मुख्यमंत्री केशवचन्द गोगोई यांचे पुत्र आहेत.

रंजन गोगोई यांनी वकिलीला १९७८ साली सुरुवात केली. रंजन गोगोईंनी २००१ साली गुवाहाटी उच्च न्यायालयाचे न्यायाधील झाले. रंजन गोगोई यांची एप्रिल २०१२ ला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायधीश पदी नियुक्त झाली होती.

राष्ट्रपतींना राज्यसभेवर एकूण १२ जणांची नियुक्ती करण्याचा अधिकार असतो. विविध क्षेत्रातील दिग्गजांचा त्यांच्या क्षेत्रातील फायदा सदनाला व्हावा, हा यामागचा हेतू असतो. राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे.

राज्यसभेची एकूण सभासदसंख्या ही २५० इतकी असते. यापैकी १२ सदस्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात.

दरम्यान राज्यात २६ मार्चला राज्यसभेच्या ७ जागांसाठी मतदान आणि निकाल जाहीर होणार आहे. एकूण ७ जागांसाठी केवळ सातच अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.

शरद पवार, फौजिया खान, राजीव सातव, प्रियंका चतुर्वेदी, रामदास आठवले, उदयनराजे भोसले आणि भागवतराव कराड या ७ उमेदवारांनी अर्ज केला आहे. राज्यसभेत महाराष्ट्रातून एकूण १९ सदस्य निवडून जातात.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.