Sat. Jun 6th, 2020

कांदा खातोय भाव, टोमॅटोला मात्र सपाटून मार!

एका बाजूला कांद्याला 5 हजाराच्या पुढे भाव मिळत असताना दुसऱ्या बाजूला टोमॅटोला मातीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चांगलाच पेचात पडला आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी टोमॅटो कमीत कमी 71 रुपये प्रति क्रेट दराने विकला गेल्याने टोमॅटो उत्पादकांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे.

टोमॅटोची आवक जशी जशी वाढत आहे, तसे त्याचे भाव दिवसेंदिवस कमी कमी होत आहे.

पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी 61 रुपये प्रति कॅरेट विकला गेला होता.

सरासरी भाव 271 रुपये होता.

पण काल गुरुवारी 71 रुपये प्रति क्रेट असा कमीत कमी भाव मिळाला.

सरासरी 331 रुपये प्रति क्रेट विकला आहे.

याच बाजार समितीमध्ये कांद्याने 4 हजाराकडे झेप घेतली आहे.

टोमॅटोला मात्र सर्वात नीचांकी भाव मिळत आहे.

त्यामुळे टोमॅटो उत्पादकांनी टोमॅटोवर केलेला खर्च सुद्धा निघत नसल्यामुळे हे उत्पादक चिंतेत आहे.

बाजार समितीमध्ये टोमॅटोची 1 लाख 11 हजार 800 इतकी आवक होती.

बाजारभाव कमीत कमी 71 रुपये तर जास्तीत जास्त भाव 421 रुपये मिळाला.

टोमॅटो पीक जास्त दिवस ठेवता येत नसल्याने त्या पिकास तत्काळ बाजार समितीमध्ये घेऊन यावे लागते.

बाजार समितीमध्ये टोमॅटोला भाव नाही. त्यातच सुरू असलेला हा पाऊस या सर्व गोष्टी एकाच वेळेस आल्याने टोमॅटो उत्पादकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वाढणारी आवक लक्षात घेता टोमॅटोचे भाव अजून खाली जाण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *