Wed. Jun 19th, 2019

मासेखाऊंसाठी ‘वाईट’ बातमी, पुढील 2 महिने मासेमारी बंद!

0Shares

समुद्रातील मासेमारी बंद होताच माशांचे भाव कमालीचे वाढले आहेत. त्यामुळे मासे खाणाऱ्या मच्छीप्रेमींना आता मासे खाण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

1 जून ते 31 जुलै असा शासनाने 61 दिवसांचा मासेमारीबंदीचा कालावधी घोषित केलाय.

त्यामुळे समुद्रातील मासेमारी बंद झाली आहे.

वसई, पालघर आणि डहाणू या तीन तालुक्यांतील सुमारे 3 ते 4 हजार बोटींद्वारे मासेमारी केली जाते.

पापलेट, दाढा, घोळ, कोळंबी, शेवंड इत्यादी मासे निर्यात केले जात.

बाकीचे मध्यम पापलेट, रावस, बोंबील, सुरमई, कोत, करकरा, कोळंबी, मांदेली, आदी मासे विक्रीसाठी बाजारात येत असत.

त्यामुळे सुमारे 10 महिने मासेप्रेमींना ताजे आणि रुचकर मासे स्वस्त आणि माफक दरात उपलब्ध होत होते.

मात्र 1 जून पासून समुद्रातील मासेमारी बंद झाली असून आता मासे खाणाऱ्यांना माश्यांसाठी अधिकचा भाव मोजावा लागणार आहे.

मासेमारीबंदी कालावधीला सुरुवात झाल्यावर बाजारातील पापलेट, बोंबील, कोळंबी आदी माशांची आवक घटली आहे.

माशांच्या दराने त्यामुळे उचल खाल्ली आहे. आता माशांसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

त्यामुळे आवडीचे मासे खाणं सर्वसामान्यांना सहज शक्य होणार नाही.

शिवाय आता समुद्रातील ताजे मासे बाजारात उपलब्ध होणार नसून शीतगृहात साठवणूक केलेल्या माशांवर आपली हौस भागवावी लागणार आहे.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: