पतंप्रधान मोदींची लोकसभेत काँग्रेसवर सडकून टीका

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं आज लोकसभेत अभिभाषण पार पडलं. यानंतर लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विविध मुद्द्यांवर भाषण केलं.
यावेळी पंतप्रधानांनी काँग्रेसवर सडकून टीका देखील केली. तसेच विकासकामांचा पाढा देखील वाचला.
पंतप्रधान भाषणासाठी उभे राहिल्यावर लोकसभेत जय श्री राम अशा घोषणा दिल्या गेल्या. या घोषणांना प्रत्युतर म्हणून काँग्रेसच्या खासदारांनी ‘गांधी झिंदाबाद’ अशा घोषणा दिल्या.
मोदींची कांग्रेसवर टीका
काँग्रेसच्या मार्गावर चाललो असतो तर अनेक वर्षांनीही देशाची प्रगती झाली नसती. काँग्रेसच्या विचारसरणीने गेलो असतो तर देस बदलला नसता असंही, मोदी म्हणाले.
आमच्या सरकारमध्ये हिमंत असल्याचं मोदी म्हणाले. आमच्यात असलेल्या हिमंतीमुळे आम्ही देशासमोर असलेले अनेक अडचणीचे प्रश्न सोडवू शकल्याचं मोदी म्हणाले.
आम्ही धाडस दाखवून जम्मू-काश्मीरला असलेलं विशेष राज्याचा दर्जा काढून घेतला. हे काँग्रेसला जमल नसतं, असं मोदी म्हणाले.
मोदींच्या भाषणातील मुद्दे
1 ) आमच्या कामाचा वेग जास्त म्हणून गरीबांना हक्काची घरं मिळाली
2) आमच्या सरकारमुळे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या सोईसुविधा मिळत आहे
3) ५६ हजार कोटींचा निधी शेतकऱ्यांच्या विम्यासाठी दिला
4 ) शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढायला हवं, हीच सरकारची भूमिका
5) गांधीजी आमच्यासाठी जीवन, तुमच्यासाठी ट्रेलर, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांना टोला
6) आर्थिक विषयांवर बोलणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य.